भोर : सहा गावांसाठी 5 कोटींची पाणी योजना | पुढारी

भोर : सहा गावांसाठी 5 कोटींची पाणी योजना

भोर; पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशनअंतर्गत किवत, बारे खुर्द, बसरापूर, बारे बु., म्हाळवडी, कर्नवडी या सहा गावांच्या पाणी योजनेसाठी 4 कोटी 91 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेच्या कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतरे यांच्या विशेष प्रयत्नाने जलजीवन मिशनअंतर्गत किवत, बारे खुर्द, बसरापूर, बारे बु., म्हाळवडी, कर्नवडी या गावांसाठीच्या पाणी योजनेसाठी 4 कोटी 91 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. योजनेचे भूमिपूजन बारे खुर्द येथे पार पडला.

या वेळी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, उपाध्यक्ष अशोक शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बी. डी. गायकवाड, भोलावडेचे सरपंच प्रवीण जगदाळे, पसुरेचे सरपंच पंकज धुमाळ, बसरापूरचे सरपंच नीलम झांजले, म्हाळवडीचे दत्तात्रय बोडके, बारे खुर्दच्या सविता गायकवाड, बारे बु.च्या जयश्री वेदपाठक, किवतचे तानाजी चंदनशिव, सर्जेराव बोडके, रमेश झांजले, सुरेश कडू, सुरेश बदक आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, रस्ते, वीज, पाणीपुरवठा योजना आदी लोकोपयोगी कामे गावागावांत पोहचविल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागांचा विकास झाल्याचे शिवतरे यांनी सांगितले.

Back to top button