पुणे : विद्यार्थ्यांमधील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी उपक्रम ! | पुढारी

पुणे : विद्यार्थ्यांमधील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी उपक्रम !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  “रॉमधून बेस्ट” निर्माण करण्याबरोबरच “स्टेम रेडी ” उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील शास्त्रज्ञ घडवण्याचा उपक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या (आयआयसर) माध्यमातून राबवला जात आहे. शिक्षकांनीदेखील “लर्निंग बाय डूईंग ” प्रमाणे आयआयसरच्या प्रयत्नांना साथ देत पाच दिवसीय प्रशिक्षणात अनोखे प्रयोग केले.  शासकीय उपक्रमातून ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या ‘सीएसआर’मधून स्टेम रेडी प्रकल्पांतर्गत सरकारी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी पाषाणमधील ‘आयआयसर’च्या वतीने शिक्षकांसाठी पाच दिवसीय कार्यशाळा पार पडली.

मंगळवारच्या (दि.7) सत्रात शिक्षण विभागाचे व्हिजिटिंग फॅकल्टीचे नागार्जुन जी. ‘आयआयसर’चे डॉ. चैतन्य मुंगी यांचा प्रमुख सहभाग होता. या सत्रात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या विविध संकल्पनांना वाव देत सहज शिकवता येईल, असे प्रशिक्षण देण्यात आले. यामागे उद्देश हाच होता, की टिंकरिंग लॅब शाळांमध्ये असूनही केवळ शिक्षकांना ट्रेनिंग नसल्याने ते वर्गापर्यंत पोहोचत नाही. याकरिता अगदी सहजपणे मुलांमधील संशोधकवृत्ती शोधून संशोधक कसा घडवता येईल, याचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षण घेत असलेल्या शिक्षिका सोनाली तनपुरे व स्नेहलता शेलार म्हणाल्या, ‘आतापर्यंत अनेक प्रशिक्षण घेतली असली, तरी हसतखेळत अद्ययावत शिक्षण व प्रशिक्षण ‘आयआयसर’च्या कार्यशाळेत मिळाले.

वेस्ट समजला जाणारा कागद व रबर बँडपासून ते टू डी – फोर डीपर्यंत वस्तू कमी किमतीत कशा बनवता येतात, हे अनुभवले. याशिवाय, मुले आजकाल मोबाईलचा अतिवापर करीत असली, तरी त्याच मुलांना स्टीमुलेट करून गेमद्वारे शिक्षण दिले जाऊ शकते, हे सहजपणे शिकलो.’

शाळा शाळांमधून शास्त्रज्ञ घडवण्याचा उपक्रम

केंद्र सरकारने ‘आयआयसर’च्या  माध्यमातून सुरू केला आहे. 5 वेळा प्रशिक्षण घेतल्यानंतर देशभरातील प्रत्येक शाळेस एक लाख रुपयाचे टिंकरिंग लॅबसाठी प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रा. एम. एस. संथानम (डीन इंटरनॅशनल रिलेशन अँड आउटरीच), डॉ. कुंदन सेनगुप्ता (असोसिएट डीन), डॉ. अपर्णा देशपांडे (विज्ञान क्रियाकलाप केंद्राच्या प्रभारी प्राध्यापक), शुभांगी वानखेडे (मुख्य तांत्रिक अधिकारी ड्ढ एंडॉवमेंट, आउटरीच ),  अशोक रूपनर (वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – विज्ञान क्रियाकलाप केंद्र), अंकिश तिरपुडे (तांत्रिक सहायक) यांच्यासह टीम सदस्य डॉ. तेजल व्यास, सर्वेश गोरीवाले, सुरभी पंड्या, अमोल देशमुख, सुदर्शन गवळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button