पुणे : तंत्रशिक्षण अभ्यासक्रम शनिवार, रविवारीही!

पुणे :  तंत्रशिक्षण अभ्यासक्रम शनिवार, रविवारीही!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तंत्रशिक्षण संस्थांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत व्हावे, यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सुधारित शैक्षणिक वेळापत्रकानुसार शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी जादा तासिका वर्ग आयोजित करून अभ्यासक्रम व सत्रकर्म पूर्ण करून घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी संलग्न तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांना दिले आहेत.

डॉ. चितलांगे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठ कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीदरम्यान नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा व शैक्षणिक शिस्त यांचे नियोजन आणि महाविद्यालयांच्या परीक्षा व त्यांचे निकाल, सीईटी तसेच वार्षिक प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करणे, अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार मंडळाने व राज्यातील पदविका अभ्यासक्रमाच्या स्वायत्त संस्थांनी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष परीक्षा 31 मे 2023 पर्यंत पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करून 30 जून 2023 पर्यंत निकाल जाहीर करावेत. तसेच, नवीन शैक्षणिक वर्ष 24 जुलै 2023 पासून सुरू करावे, असे स्पष्ट केले आहे. सुधारित शैक्षणिक वेळापत्रकाबाबत संस्थांच्या प्राचार्यांनी संस्थेतील अध्यापक व
विद्यार्थ्यांना सूचित करावे, असे डॉ. चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.

सुधारित शैक्षणिक वेळापत्रक जाहीर
सम सत्रांचे सुधारित वेळापत्रक
दुसरे, चौथे, सहावे, आठवे सत्र – 1 फेब्रुवारी ते 6 मे
प्रथम सत्र परीक्षा – 15 ते 17 मार्च
द्वितीय सत्र परीक्षा – 26 ते 28 एप्रिल

वार्षिक पॅटर्न – 26 डिसेंबर 2022 ते 6 मे 2023
प्रथम सत्र परीक्षा
द्वितीय सत्र परीक्षा – 26 ते 28 एप्रिल

प्रथम वर्ष फार्मसी – 26 डिसेंबर 2022 ते 6 मे 2023
प्रथम सत्र परीक्षा – 6 ते 10 फेब—ुवारी
द्वितीय सत्र परीक्षा – 3 ते 7 एप्रिल
तृतीय सत्र परीक्षा – 24 ते 28 एप्रिल

द्वितीय वर्ष फार्मसी – 26 डिसेंबर 2022 ते 6 मे 2023
प्रथम सत्र परीक्षा
द्वितीय सत्र परीक्षा – 20 ते 24 फेब—ुवारी
तृतीय सत्र परीक्षा – 24 ते 28 एप्रिल

असे आहे परीक्षांचे वेळापत्रक
प्रात्यक्षिक परीक्षा – 7 ते 14 मे
लेखी परीक्षा – 17 मे ते 6 जून
आय स्कीम चौथे सत्र परीक्षा – 7 जून ते 22 जुलै
परीक्षा निकालाची तारीख – जून महिन्यातील चौथा आठवडा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news