चिंचवड पोटनिवडणूक : अश्विनी जगताप यांच्यासह 10 जणांचे अर्ज दाखल | पुढारी

चिंचवड पोटनिवडणूक : अश्विनी जगताप यांच्यासह 10 जणांचे अर्ज दाखल

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी सोमवारी (दि. 6) उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, भाजपचा डमी अर्ज म्हणून माजी नगरसेवक शंकर जगताप यांनीही अर्ज भरला असून, 8 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

अर्ज भरण्यापूर्वी अश्विनी जगताप यांनी पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांच्या उपस्थितीत रावेत येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तोपर्यंत पक्षाकडून उमेदवार जाहीर केला नव्हता.

Back to top button