मोठी बातमी ! पुणे : कसब्यातील जागेसाठी कॉँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी ; कसबा गणपतीचे दर्शन घेऊन केले शक्तिप्रदर्शन | पुढारी

मोठी बातमी ! पुणे : कसब्यातील जागेसाठी कॉँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी ; कसबा गणपतीचे दर्शन घेऊन केले शक्तिप्रदर्शन

पुढारी ऑनलाईन :  पुण्यात आता पोटनिवडणुकीच्या वातारणाला खरं रंग चढू अंगाला आहे. आज भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार अर्ज भरणार आहेत. कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. ही जागा कॉँग्रेसकडे गेल्याने या जागेवर माजी नगरसेवक  रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली गेली आहे.  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केलं. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही या शक्तिप्रदर्शनात उपस्थित होते. गणपतीच्या दर्शनानंतर धंगेकर आज अर्ज दाखल करतील. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित असणार आहेत.

हेमंत रासनेही आज अर्ज भरणार.. 

काही वेळापूर्वीच ग्रामदैवत कसबा गणपती यांची दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने बाहेर पडले आहेत. यावेळी  पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

रवींद्र धंगेकर यांचं नाव जागेसाठी सगळ्यात जास्त चर्चेत होतं. यापूर्वी ९ इच्छुकांची यादी कॉँग्रेसकडे होती त्यातून पटोले यांनी धंगेकर यांच्या नावाची निवड केली. जवळपास ५ टर्म धंगेकर यांनी नगरसेवकपदाची धुरा सांभाळली आहे. येत्या २६ फेब्रुवारीला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. तर २ मार्चला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

 

Back to top button