पुणे : महसूल विभागाच्या मध्यस्थीने रस्त्याचा वाद मिटला | पुढारी

पुणे : महसूल विभागाच्या मध्यस्थीने रस्त्याचा वाद मिटला

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : खंडोबाचीवाडी (ता.बारामती) येथील शेतात जाणारा रस्ता गेल्या सात वर्षांपासून वाहतुकीस बंद होता. अखेर बारामती महसूल विभागाने दोन शेतकर्‍यांमधील वाद मिटवत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. ग्रामस्थांनी वाद मिटवल्याबद्दल महसूल विभागाच्या अधिका-यांचे आभार मानले.  खंडोबाचीवाडी येथे गट क्र. 351 मधील बबन गेनाबा लकडे व पुष्पा सोपान लकडे यांच्यात रस्त्यावरून सात वर्षांपासून वाद होता. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, बारामती मंडल अधिकारी राजू पारधी, तलाठी दादासाहेब आगम, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दीपक वारुळे, अमोल भोसले यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. अधिकार्‍यांनी दोन्ही फिर्यादींना समोरासमोर घेऊन या वादावर सामंजस्याने कायमचा पडदा टाकला. या वेळी खंडोबाचीवाडी व गडदरवाडी येथील बापु गडदरे, अतुल लकडे, सोमनाथ कटरे, रावबा धायगुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

..आणि तलाठी भाऊसाहेबांनी घेतला हातात कोयता

गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित रस्ता शेतकर्‍यांच्या समंजस भूमिकेमुळे मोकळा करण्याचे ठरल्यानंतर तलाठी आगम यांनी स्वतः हातात कोयता घेत उभा ऊस तोडण्यास सुरुवात केली. यानंतर शेतकर्‍यांनीही यात सहभाग घेत रस्ता करून देण्यास मदत केली.

Back to top button