बारामती : साबळेवाडीत जलजीवन योजनेचे काम निकृष्ट ; ग्रामस्थांची अजित पवार यांच्याकडे धाव | पुढारी

बारामती : साबळेवाडीत जलजीवन योजनेचे काम निकृष्ट ; ग्रामस्थांची अजित पवार यांच्याकडे धाव

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील साबळेवाडी येथे जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी (दि. 4) बारामती दौर्‍यावर आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही ग्रामस्थांनी याबाबत भेट घेत त्यांना होत असलेल्या निकृष्ट कामाची छायाचित्रे व व्हिडीओ दाखवले. त्यावर पवार यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

साबळेवाडी गावामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत 4 कोटी 50 लाख रुपयांचे काम सुरू आहे. काम एका ठेकेदाराच्या नावावर घेतलेले असले, तरी गावातीलच काहीजण ते करत आहेत. अंदाजपत्रकानुसार काम सुरू नसून, ते निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. अनेकदा यासंबंधी संबंधित अधिकार्‍यांकडे लेखी, तोंडी तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. परंतु त्यानंतरही कामाच्या दर्जामध्ये सुधारणा झाली नाही. कामाच्या अंदाजपत्रकानुसार 4.25 फूट खोदाई होणे अपेक्षित आहे. परंतु 2 फूट खोदाईतच पाइप गाडले जात आहेत.

ही योजना तालुक्यातील एका मोठ्या राजकीय पदाधिकार्‍याच्या नावाखाली सुरू ठेवली आहे. तो पदाधिकारी यात भागीदार आहे, अशी गावात चर्चा आहे. योजनेसाठी खोदाई करताना सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडून कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. साइडपट्टीच्या जागेतून योजना राबवली जात आहे. त्यामुळे मिळालेल्या योजनेच्या निधीचा अपव्यय होत आहे. अजित पवार यांनी यात लक्ष घालून तत्काळ चांगले काम व्हावे यासाठी आदेश द्यावेत अन्यथा येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती व लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर विनोद गुळुमकर,

Back to top button