उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत रासने यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | पुढारी

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत रासने यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासने यांनी उमेदवारी जाहीर होताच दगडूशेठ गणपतीची आरती केली. दगडूशेठ गणपती मंदिरासमोर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक विक्रमी मतांनी भाजप जिंकणार,” असा त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच ही निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात येईल असं रासने यांनी स्पष्ट केलं.

“कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला केली होती. भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकण्यास सक्षम आहे,” असे हेमंत रासने यांनी सांगितले. भाजपचे सर्वात जुने कार्यकर्ते म्हणून हेमंत रासने यांची ओळख आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे ते अध्यक्ष देखील होते.

गेल्या ३० वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

Back to top button