बिग बॉस फेम बिचुकलेही आता पोटनिवडणुकीच्या रिंगणात; घरातील हा सदस्य भरणार अर्ज | पुढारी

बिग बॉस फेम बिचुकलेही आता पोटनिवडणुकीच्या रिंगणात; घरातील हा सदस्य भरणार अर्ज

पुणे : पुढारी ऑनलाईन : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांची घोषणा झाल्यापासून पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नेत्यांच्या बैठका, इच्छुकांची मोर्चेबांधणी आणि जनतेचे अंदाज या सगळ्या गोंधळात एक वेगळं नाव समोर येताना दिसत आहे. २७ तारखेला कसबापेठेतील पोटनिवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. यासाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांची पत्नी अलंकृता यांनी अर्ज घेतल्याचं समजत आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत सात अपक्षांनी अर्ज घेतल्याचं समोर आलं आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या अलंकृता पेशाने एलआयसी एजंट आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी बिचुकले यांनी पत्नी अलंकृता यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनविण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे आता कसबा पोटनिवडणुकीची चुरस आणखी वाढेल यात शंका नाही.

भाजपाचे उमेदवार जाहीर
नुकतेच भारतीय जनता पार्टीने पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. कसबा विधानसभेसाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांचं नाव समोर आलं आहे.

Back to top button