पुणे : महापालिकांच्या इमारतींवर उभारणार कचरा प्रकल्प ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

धायरी : पुढारी वृत्तसेवा :  'राज्य सरकारच्या वतीने कचरा निर्मुलन व परिसर स्वच्छ राखण्यासाठी वेगाने वाटचाल सुरू आहे. सोसायट्यांसह घरच्या घरी ओला कचरा जिरविण्यासाठी टेरेसवर कचरा प्रकल्प निर्माण होणे गरजेचे आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या व इतर सरकारी इमारतींवर ओला कचरा जिरविण्यासाठी प्रकल्प उभे केले जातील,' असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वडगाव बुद्रुक येथे शुक्रवारी सिंहगडरोड क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आमदार भीमराव तापकीर, महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनर, उपयुक्त आशा राऊत, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, मंजुषा नागपुरे, बाळासाहेब नवले, सचिन मोरे, दिलिप नवले, सुरज लोखंडे, अतुल चाकणकर आदी या वेळी उपस्थित होते. साईजन सेवा प्रतिष्ठान, ग्रीन व्हिजन मॅनेजमेंट व क्षेत्रीय कार्यालयच्या वतीने हा प्रकल्प तयार आला असून त्याततीस लिटरच्या बकेटमध्ये दररोज अडीचशे ते तीनशे किलो ओला कचरा जिरवला जात असल्याचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी सांगितले. महापालिकेच्या व्हेइकल डेपो मार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी खरेदी करण्यात आलेल्या 20 कॉम्पॅक्टर वाहनांचे लोकार्पणही या वेळी करण्यात आले. प्रास्ताविक गीता मोहोरकर यांनी केले.

असा आहे प्रकल्प
महापालिकेचे कर्मचारी वडगाव येथील भाजी मार्केटमधील टाकाऊ भाजीपाला, फुले आदींचा ओला कचरा या प्रकल्पाच्या बकेटमध्ये टाकतात. या बकेटला तळाला सात ते आठ छिद्रे आहेत. बकेटमध्ये तळाला विटांचे तुकडे, नारळाच्या शेंड्या, बायोकल्चर आणि ओला कचरा थर देऊन भरला जातो. या प्रकल्पात कचर्‍यावर प्रकिया करण्याच्या एकूण 90 बकेट आहेत. या बकेटमध्ये ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया होऊन त्याचे खत तयार होते. हा प्रकल्प डिसेंबरपासून सुरू असून, आतापर्यंत यामध्ये दररोजचा दोनशे किलो ओला कचरा जिरला जात आहे. तसेच या ठिकाणी फळझाडे, फुलझाडे, तुळशीची रोपेही लावण्यात आली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news