पुणे : एडिटिंग ही परिणामकारक कला ; ‘पिफ’महोत्सवामध्ये चित्रपट एडिटर ए. श्रीकर प्रसाद यांचे मत

पुणे : एडिटिंग ही परिणामकारक कला ; ‘पिफ’महोत्सवामध्ये चित्रपट एडिटर ए. श्रीकर प्रसाद यांचे मत
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चित्रपटाचा दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाच्या माध्यमातून आपली छाप सोडत असतो. कॅमेरामन हा व्हिज्युअलच्या माध्यमातून दृश्यस्वरूपात कथा मांडत असतो, तर अभिनयाच्या माध्यमातून कलाकार ती गोष्ट गुंफत असतात. मात्र, चित्रपटाचा एडिटर करीत असलेले काम हे इनव्हिजिबल आर्ट अर्थात अदृश्य कला आहे. मात्र, त्याची परिणामकारकता ही चित्रपटाच्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक असल्याचे मत नऊवेळा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट एडिटर ए. श्रीकर प्रसाद यांनी व्यक्त केले. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित 21 व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी 'दी इनव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग' या विषयावर ए, श्रीकर प्रसाद हे बोलत होते.

महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते यांनी प्रसाद यांच्याशी संवाद साधला. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. प्रसाद म्हणाले, भारतीय चित्रपट हा भाषा, भावना, डायलॉग आणि दृश्य यांचा समृद्ध मेळ असून, हे सर्व एका धाग्यात जोडण्याचे प्रमुख काम एडिटर करीत असतो. दिग्दर्शकाचे व्हिजन एडिटर पूर्णत्वास नेतो आणि म्हणूनच एडिटर व दिग्दर्शक यांच्या विचारांचा मेळ संपूर्ण चित्रपटाच्या प्रक्रियेत एक गेमचेंजर असतो. आज तांत्रिक गोष्टींसंदर्भात आपण बरेच प्रयोगशील झालो आहोत. मात्र, केवळ व्हीएफएक्समध्ये न अडकता गरज असेल तिथेच अशा बाबींचा वापर करणे योग्य आहे.

'गोल्डन ग्लोब' पुरस्कार पटकाविलेल्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याचा अनुभव कथन केला. ते म्हणाले, दोन तेलगू सुपरस्टार एकमेकांसमोर येत 'कॅमेरा डेअर'ने एकत्र डान्स करताहेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, त्याला भावनिक जोड आहे, या विचाराने दिग्दर्शकाने पूर्ण पॅशनने, प्रयत्नपूर्वक आणि परिश्रम घेत हे गाणे शूट केले. या दोन्ही सुपरस्टार्सची ती डान्स करतानाची एनर्जी र्‍हीदमच्या मदतीने मांडण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न यशस्वी झाला. केवळ भारतीय प्रेक्षक नाही तर जगभरातील प्रेक्षकांना याने भुरळ घातली. या गाण्याच्या यशाने आज भारतीय चित्रपटसृष्टीसाठी भविष्यात अनेक कवाडे खुली झाल्याचा आनंद आहे.'प्रेक्षकांनी एखादा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या विचारांप्रमाणे मत बनविणे चुकीचे आहे. तुम्ही खुल्या विचाराने चित्रपट पाहा. तो तुम्हाला आवडेल, नाही आवडणार; पण तो बनविणार्‍याचा सन्मान तुम्ही निश्चित करा, असेही प्रसाद यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news