पुणेकरांनी पाहिली ‘वंदेभारत’ रेल्वे ; गुरुवारी पुणे रेल्वे स्थानकावर दाखल

वंदे भारत एक्स्प्रेस
वंदे भारत एक्स्प्रेस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेली 'वंदेभारत' ही नवी रेल्वे गाडी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पुणेकर प्रवाशांनी पाहिली. त्या वेळी अनेक प्रवाशांनी या रेल्वे गाडीसोबत सेल्फी आणि फोटो काढण्याचा आनंद घेतला. येत्या 10 तारखेला पुणे-सोलापूर आणि पुणे-साईनगर शिर्डीसाठी नव्या दोन वंदेभारत रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत.

त्यांचे उद्घाटन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या दोन्ही गाड्यांची चाचणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सोलापूरहून पुण्यात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ही गाडी आली. पुण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही गाडी थांबविण्यात आली होती. त्यानंतर ही गाडी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, लालवाणी हे यांनी या गाडीची पाहाणी केली. तसेच, घाट रस्त्यांवरदेखील त्यांनी या गाडीची पाहाणी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news