पुण्याचा रिंगरोड होणार देशात सर्वोत्तम ; 30 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष काम सुरू | पुढारी

पुण्याचा रिंगरोड होणार देशात सर्वोत्तम ; 30 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष काम सुरू

दिगंबर दराडे : 

पुणे : चार वर्षांत काम पूर्ण करून देशातील सर्वांत उत्तम रिंगरोड करण्याचा ’मास्टर प्लॅन’ राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने (एनएचआय)े तयार केला आहे. ऑक्टोबरपासून  रिंगरोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. शेतकर्‍यांना समाधानकारक पॅकेज देण्यासाठी युद्धपातळीवर जिल्हा प्रशासनाचे काम सुरू आहे.

पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 170 कि.मी. लांबीच्या पुणे रिंगरोडमुळे राज्याच्या विविध भागांतील वाहने शहराच्या मुख्य रस्त्यावर न जाता बाहेर जाणार आहेत. याचबरोबर वाहतूक कोंडी कमी होण्यासदेखील मोठी मदत होणार आहे. हा सहा लेनचा एक्स्प्रेस हायवे असेल. वाहनाची वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर असेल. अंदाजे बांधकाम खर्च (भूसंपादन खर्च समाविष्ट न करता) अंदाजे रु. 17,412 कोटी आहे. पुणे रिंगरोड प्रकल्पाला 83 गावांमधील भूसंपादनासाठी सुमारे 11,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम गतीने सुरू असून, हे काम 30 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्लॅन तयार केला आहे. लाभार्थ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी पॅकेज तयार करण्यात येत आहे. हा रिंगरोड दोन टप्प्यांत विस्तारणार आहे. पूर्व आणि पश्चिम असा हा रोड राहणार आहे. दोन्ही पालखीमार्गाची कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत.

विशेष म्हणजे अंतिम दर ठरवताना कायद्यातील सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. यामुळे कोणत्याच शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही. निश्चितच रिंगरोडच्या भूसंपादनासाठी आता गती मिळणार असून, लवकरच प्रकल्प बाधित शेतकर्‍यांना भूसंपादनाची रक्कम मिळेल. आता बाधित गावामध्ये शिबिरे घेतली जाणार आहेत. या शिबिरात बाधित शेतकर्‍यांची संमती पत्रे आणि करारनामे केले जातील. तसेच, बाधित जमीन ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे या शिबिरांमध्ये हस्तांतरित होणार आहेत. याचबरोबर पूर्व रिंगरोडचे दरनिश्चितीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

शिवरे ते कासुर्डे  हा रस्ता एनएचआय करणार आहे. रस्ते विकास महामंडळाने आणि जिल्हा प्रशासनाने भूसंपादन करून दिल्यानंतर 36 किलोमीटर लांबीचा रस्ता एनएचआय करणार आहे. त्याकरिता केंद्र सरकारकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
                                      – संजय कदम,  नॅशनल हायवे प्रकल्प अधिकारी

 

असा आहे मास्टर प्लॅन

2025 पर्यंत
रिंगरोड पूर्ण करणार
शिवरे ते कासुर्डे रस्ता
एनएचआय बनविणार
एकूण लांबी :
128.08 कि.मी.
मार्गाचा उजवा :
110.0 मीटर
मुख्य कॅरेजवे :
4 + 4 लेन

सर्व्हिस रोड :
2 + 2 लेन
रेल्वे ओव्हर बि—ज :
3 उड्डाणपूल : 6 क्रमांक
बोगदे : 3.75 कि.मी.
प्रमुख पूल : 18
किरकोळ पूल : 5
बॉक्स कल्व्हर्ट्स :
200 एलिव्हेटेड
कॉरिडॉर/स्ट्रक्चर्स : 52

Back to top button