पुणे : अल्पवयीन मुलीचा पुन्हा विनयभंग | पुढारी

पुणे : अल्पवयीन मुलीचा पुन्हा विनयभंग

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तीने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा देखील दाखल झाला होता. यानंतरही आरोपीने पुन्हा तरूणीच्या घराजवळ येऊन आरडा ओरडा करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज भारत पवार (26, रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 17 वर्षीय पिडीत मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 1 फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Back to top button