पुणे: पैसे परत न दिल्याने घरावर हल्ला, पाच जणांच्या टोळक्यावर गुन्हा, दोघांना अटक | पुढारी

पुणे: पैसे परत न दिल्याने घरावर हल्ला, पाच जणांच्या टोळक्यावर गुन्हा, दोघांना अटक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दिलेले पैसे परत न केल्याने पाच जणांच्या टोळक्याने हातोडी, कोयते आणि तलवारींनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

रिंकु उर्फ अमरसिंग कलवंतसिंग चौहान (34, रा. पिंपरी), बिट्टु उर्फ मनप्रित सुखदेवसिंग माही (27) या दोघांना अटक करण्यात करण्यात आली आहे. तर दिलीप इंद्रजित चव्हाण, सिमु आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बलजिंदर दिलावरसिंग भट्टी (56, रा. रेवरी अपार्टमेंट, साईनाथनगर, चंदननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलजिंदर यांच्या वडीलांनी उसण्या घेतलेल्या पैशातून हा प्रकार घडला.

Back to top button