पुणे : अजित पवारांची आज पुण्यात, काँग्रेसची मुंबईत बैठक | पुढारी

पुणे : अजित पवारांची आज पुण्यात, काँग्रेसची मुंबईत बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी पुण्यात इच्छुक उमेदवारांची बैठक घेत आहेत, तर काँग्रेसच्या प्रदेशातील नेत्यांची या मतदारसंघाबाबत मुंबईत बैठक होणार आहे. भाजपचे कार्यकर्ते मतदारसंघात प्रचाराला लागले असून, पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार यासंदर्भात त्यांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
चिंचवड मतदारसंघात दोघांनी आज अर्ज दाखल केले.

कसबा पेठ मतदारसंघात मात्र अद्याप कोणाचाही अर्ज दाखल झालेला नाही. कसबा पेठ मतदारसंघात महाविकासआघाडी एकत्र निवडणूक लढविणार असून, त्यासंदर्भात पुढील दोन दिवसांत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. कसबा पेठ मतदारसंघातून भाजपसमोर आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. ‘आप’देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भात उत्सुकता असून, मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार की पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी देणार, यासंदर्भात कार्यकर्त्यांत सध्या संभ—माचे वातावरण आहे.

Back to top button