पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या स्वीकृत संचालकांचा राजीनामा अद्याप नाही ; पुढील संचालकांच्या निवडणुका रखडल्या

File photo
File photo

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन स्वीकृत संचालकांची मुदत 28 जानेवारीला संपूनही राजीनामा न दिल्यामुळे पुढील संचालकांच्या निवडणुका रखडल्याची चर्चा 'सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रात  होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवड होतानाच उपाध्यक्ष व स्वीकृत संचालक एक वर्षासाठीच असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले होते. माजी उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांची उपाध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर वेळेत राजीनामा दिला. यानंतर त्यांच्या जागी प्रणीता खोमणे यांची निवड करण्यात आली. स्वीकृत संचालकांचा कार्यकाळ संपल्याने त्यांचा राजीनामा होताच नवीन संचालकपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

याबाबत वरिष्ठ पातळीवरून संचालकांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजत आहे. संचालकपदावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. 'सोमेश्वर'च्या संचालकपदावरून पुरंदर आणि बारामती तालुक्याला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. या अगोदर तुषार माहूरकर (माहूर, ता. पुरंदर) आणि अजय कदम (ता. खंडाळा) यांची स्वीकृत संचालकपदावर वर्णी लागली होती. मात्र, त्यांनी अद्याप राजीनामा न दिल्याने अनेक इच्छुक आता वेटिंगवर आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news