पुणे : ‘सांभर’ची शिंगे जप्त ; मुळशी वनविभागाची कारवाई | पुढारी

पुणे : ‘सांभर’ची शिंगे जप्त ; मुळशी वनविभागाची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : थेरगाव येथील एका घरात सांभर प्रजातीच्या वन्यप्राण्याची शिंगे तोंडाच्या सांगाड्यासह आढळून आली. वनविभागाच्या पथकाने शिंगे जप्त केली आहेत.  मुळशी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल घोटावडे, प्रज्ञा बनसोडे, वनरक्षक पांडुरंग कोपणार, संतोष मुंढे व इतर कर्मचारी यांनी थेरगाव येथे राहत्या घराची झडती घेतली. शिंगे लाकूड व पीओपीपासून बनवलेली असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. सांगाडा ताब्यात घेऊन तपासणी केली असता, सदरची शिंगे ही सांभर प्राण्याचीच असल्याचे आढळून आले. ही शिंगे 20 वर्षांपासून घरामध्ये असल्याचे आरोपीने कबूल केले.

संबंधित आरोपीवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 39, 50, 51 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, तसेच सहा वनसंरक्षक मयूर बोठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण करीत आहेत. दरम्यान, वन्यजीवांची शिकार करणे, तस्करी करणे किंवा वन्यजीवांचे अवशेष जवळ बाळगणे, हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत गुन्हा असून, 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा र्द्व्यदंड किंवा दोन्ही होऊ शकतात.
अशा घटना निदर्शनास आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button