

पुणे: जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवेळी पाऊस, गारपिटीमुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त सुमारे 16 हजार 61 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिके, फळपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, शेतजमिनींचेही अतिपावसामुळे नुकसान झाले.
त्यासाठी संबंधित शेतकर्यांना 44 कोटी 50 लाख 58 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी जिल्ह्याधिकार्यांकडे सादर केला आहे. (Latest Pune News)
जिल्ह्यातील एकूण 50 हजार 715 शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी लागणार असून, सर्वाधिक पिकांचे व जमिनीचे नुकसान हे दौंड, बारामती, इंदापूर, खेड आणि जुन्नर तालुक्यांत झाले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून एकत्रितरीत्या नुकसानीचा अहवाल अंतिम केला जातो.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये मे महिन्यात प्रामुख्याने शेतपिके व फळपिकांचे 857 गावांतील 46 हजार 29 शेतकर्यांच्या सुमारे 15 हजार 35 हेक्टरवरील पिकांचे अवेळीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. तसेच, पावसामुळे जमिनीचीही हानी झालेली आहे. त्यामध्ये नऊ तालुक्यांतील 137 गावांना त्याचा फटका बसला आहे. तसेच, चार हजार 686 शेतकर्यांचे एक हजार 26 हेक्टरवरील जमिनीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यानुसार स्पष्ट झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना करावयाच्या आर्थकि मदतीबाबत शासन निर्णय 1 जानेवारी 2024 नुसार प्रतिहेक्टरी दर हे कोरडवाहू पिकांसाठी 13 हजार 600 रुपये, बागायती पिकांसाठी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी (फळपिके) 36 हजार रुपये आहे. तर, दि. 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार आर्थकि साहाय्याचे दर प्रतिहेक्टरी कमीत कमी साहाय्यता दर हा कोरडवाहू पिकांसाठी एक हजार रुपये, बागायतीसाठी दोन हजार रुपये आणि बहुवार्षकि पिकांसाठी 2500 रुपये आहे.
या शासन निर्णयानुसार आणि पंचनाम्यातील अहवालानुसार झालेल्या नुकसानीचा विचार करता 46 हजार 29 शेतकर्यांच्या शेतपिके व फळपिकांसाठी मिळून 41 कोटी 23 लाख 98 हजार रुपये आणि चार हजार 868 शेतकर्यांच्या शेतजमीन नुकसानीसाठी तीन कोटी 26 हजार 60 हजार रुपये मिळून एकूण 50 हजार 715 शेतकर्यांना सुमारे 44 कोटी 50 लाख 58 हजार रुपयांइतकी आर्थकि मदत संबंधित शेतकर्यांना द्यावी लागणार आहे.