पुणे :अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

पुणे :अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सोळा वर्षाच्या मुलीवर कात्रज येथील घरी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी एकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीने मुलीला तिच्या शाळेतून तिला बोलवून कात्रज येथे घेऊन जात अत्याचार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक माणिक काळे (21, रा. कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2023 दरम्यान घडला. आरोपीने झालेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Back to top button