पिंपरी : कामशेत येथील खिंडीत तीन गाड्यांचा अपघात | पुढारी

पिंपरी : कामशेत येथील खिंडीत तीन गाड्यांचा अपघात

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : कामशेत येथील खिंडीमध्ये सकाळी 11 ते साडेअकराच्या दरम्यान तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार व्यक्ती जखमी झाल्या असून एक जण गंभीर आहे. कामशेत येथून पुण्याहून मुंबईला जाणारा एक कंटेनर भरधाव वेगाने जात असताना त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर डिव्हायडर तोडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर गेला. त्यावेळेस पुण्याच्या दिशेने जाणार्‍या दोन गाड्यांना धडक देऊन कंटेनर 100 मीटर खाली जाऊन पडला.

कंटेनरने एका टू व्हीलरला व बलेनो या गाडीला धडक दिली. दुचाकीस्वार गंभीर जखमी असून तर ‘बोलेरो’मधील तीन व्यक्ती जखमी झाले आहेत. राजेंद्र श्रीवास्तव (रा. मळवली) गंभीर जखमी आहेत. रतन शहा, रिद्धी शहा, स्वरा शहा (रा. हडपसर, पुणे) जखमी असून तिघेजण कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करत आले असेल त्यांच्यावर तर रतनगर शहा यांचे कार्ला येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.

यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. कामशेत पोलिस घटनास्थळी पोहोचून त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली व अपघात झालेल्या गाड्या बाजूला केल्या. दुचाकी व बलेनो गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

Back to top button