पिंपरी : टोमॅटो, पालेभाज्यांच्या दरात वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बाजारात टोमॅटो आणि पालेभाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे, तर कांद्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत साडेतीनशे क्विंटलने वाढली असल्याने दरात वाढ झाली नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये गेल्या आठवड्यात कोथिंबीर, मेथी, पालक भाजीचे दर दहा रूपये प्रति पेंडी होते. तर टोमॅटो प्रतिकिलो पंधरा रूपये दराने विक्री झाली. मात्र या रविवारी सर्व पालेभाज्यांच्या दरात वाढ होऊन, तीस रूपये प्रती जुडी दराने विक्री झाली. तसेच प्रतिकिलो 15 रूपयाला विक्री झालेल्या टोमॅटोच्या दरात पंधरा ते वीस रूपयांची वाढ होऊन तीस रूपये किलोने विक्री झाली.
तसेच गेल्या आठड्यात कांद्याची आवक 287 क्विंटल झाली होती. मात्र या आठवड्यात 647 क्विंटल आवक होऊन 360 क्विंटलने आवक वाढली आहे. कांदाची घाऊक दरातील विक्री 12 ते 15 रूपये किलोने झाली. मेथी, पालक, कोथंबिर 7 ते 10 रूपये, बटाटा 10 ते 12 रूपये, टोमॅटोची 10 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.
कोबीची आवक 212 क्विंटल, टोमॅटो 572 क्विंटल, भेंडी 41 क्विंटल, फ्लॉवर 277 क्विंटल आणि वांगीची आवक 69 क्विंटल एवढी झाली. तसेच बटाटा 519, काकडी 111क्विंटल एवढी आवक झाली. पालेभाज्यांच्या एकूण 47,700 गड्डी तर फळांची 4628 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3394 क्विंटल एवढी झाली.
पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे
किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रति जुडी)
मेथी 30
कोथिंबीर 30
कांदापात 25
शेपू 20
पुदिना 20
मुळा 15
चुका 15
पालक 30
फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 25
बटाटा 30
लसूण 50
आले 50
काकडी 40
भेंडी 70
गवार 100- 110
गावरान गवार 140
टोमॅटो 30
दोडका 40
हिरवी मिरची 60
दुधी भोपळा 40
लाल भोपळा 40
कारली 40
वांगी 100
भरताची वांगी 40
तोंडली 50
पडवळ 40
फ्लॉवर 60
फळभाज्यांचे किलोचे भाव
कोबी 20
शेवगा 100-110
गाजर 50-60
(महाबळेश्वर)
गाजर (दिल्ली) 30
ढोबळी मिरची 50
वटाना 40
बिन्स 50
बीट 30
आवळा 50
राजमा 30