पुणे : मासळीच्या दरातील तेजी कायम | पुढारी

पुणे : मासळीच्या दरातील तेजी कायम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : थंडीचा परिणाम झाल्याने बाजारातील मासळीची रोडावलेली आवक कायम आहे. आवकेच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने मासळीचे गेल्या आठवड्यातील तेजीतील दर टिकून आहेत. गणेश जयंती, रथसप्तमी आदी काळात उपवास होत असल्याने मागील आठवड्यात चिकन व अंडीला मागणी कमी राहिली. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने चिकनचे भाव किलोमागे दहा रुपये तर इंग्लिश अंडी शेकड्यामागे पन्नास रुपयांनी उतरली आहेत. गावरान अंडी व मटणाचे भाव स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 29) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 15 टन, खाडीची 200 ते 250 किलो, तर नदीच्या मासळीची 200 ते 400 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली. खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1800-2200, मोठे : 1600-1800, मध्यम : 1200-1500, लहान : 1000-1100, भिला : 700-800, हलवा : 600-700, सुरमई : 600-800, रावस : 700-900, घोळ : 600-700, करली : 300-360, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 320-360, पाला : 1000-1200, वाम : 800-1000, ओले बोंबील : 180-220. कोळंबी : लहान 180-320, मोठी : 440-550, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 1600-1800, मोरी : 280-360, मांदेली : 120-160, राणीमासा : 180-220, खेकडे : 250-300, चिंबोर्‍या : 600-650. खाडीची मासळी : सौंदाळे : 300-320, खापी : 240-280, नगली : 600, तांबोशी : 400-480, पालू : 240-280, लेपा : 240, बांगडा : लहान 100-120 मोठा 140-160, शेवटे : 180-220, पेडवी : 80-100, बेळुंजी : 160-200, खुबे : 100-120, तिसर्या 280 तारली : 140-160. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-200, मरळ : 400-440, शिवडा : 240-320, खवली : 280-320, आम्ळी : 160-180, खेकडे : 400-440, वाम : 600. मटण : बोकडाचे : 700, बोलाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 200, लेगपीस : 250, जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 300. अंडी : गावरान (शेकडा) 1020, डझन 130, प्रतिनग 11. इंग्लिश (शेकडा) 540.

Back to top button