नगर रस्ता ठरतोय अपघाताचा सापळा; दोन दिवसांपूर्वी दोघांचा मृत्यू

नगर रस्ता ठरतोय अपघाताचा सापळा; दोन दिवसांपूर्वी दोघांचा मृत्यू

 कोरेगाव भीमा (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : वाडा पुनर्वसन फाट्याजवळ बुधवारी (दि. 25) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुहेरी अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. परिणामी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकंदरीत, पुणे-नगर हा रस्ता अपघाताचा सापळा ठरत आहे. कोरेगाव भीमा येथील महेश राजाराम गव्हाणे हा आपल्या दुचाकी वाहनाने वाडा फाटा येथून प्रवास करीत असताना नगरच्या बाजूने येणार्‍या स्विफ्ट डिझायर कार व त्याच्या दुचाकीच्या धडकेत महेश गव्हाणे यांचा मृत्यू होता.

हे कळताच महेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मदतीस येणार्‍या रुग्णवाहिकेची धडक दुचालक श्रीकांत सूर्यकांत उबाळे (रा. कोरेगाव भीमा) याला बसली. त्यामध्ये दुर्दैवाने श्रीकांत उबाळे याचा देखील मृत्यू झाला. एकाच गावातील दोन मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाला. दरम्यान, पुणे-नगर रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, पूर्वीपेक्षा या वेळी रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली आहे.

मात्र, गतिरोधक बसविले नाहीत. त्यामुळे वाहन चालविण्यास सुरळीत असलेला रस्ता व गर्दीचे प्रमाण कमी असल्याने वाहन चालविण्याच्या वेगमर्यादाचे उल्लंघन होत आहे. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहनांवर नियंत्रण मिळविणे सध्या खूपच कठीण झाले आहे. याच कारणामुळे सध्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. लवकरात लवकर रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी येथील ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

या गंभीर बाबीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बारभाई यांना भेटून आम्ही रस्त्यावर रमलर, स्पीड ब—ेकर, स्ट्रीट लाइट, रिफ्लेक्टर आदी लावण्याबाबतची चर्चा केली आहे. याबाबत लवकरच दखल घेतली जाणार आहे.
                                                                 विक्रम गव्हाणे,
                                                             सरपंच, कोरेगाव भीमा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news