आता टार्गेट 1 कोटी 80 लाख…! पीएमपी अध्यक्षांचा रोजच्या उत्पन्नवाढीसाठी नवा फंडा | पुढारी

आता टार्गेट 1 कोटी 80 लाख...! पीएमपी अध्यक्षांचा रोजच्या उत्पन्नवाढीसाठी नवा फंडा

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपीच्या उत्पन्नाची घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी पीएमपी अध्यक्षांनी आता नवा फंडा वापरायचे ठरविले आहे. त्यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना करायला सुरुवात केली असून, दर दिवशीच्या उत्पन्नाचे टार्गेट त्यांनी आता 1 कोटी 80 लाखांपेक्षा पुढेच असेल, असे निश्चित केले आहे.

पीएमपीचा घसरत चाललेला गाडा सुरळीत करण्यासाठी पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया आता विविध उपाययोजना करीत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात पीएमपीचे उत्पन्न वाढायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार 9 ते 14 जानेवारी या काळात आणि 16 ते 21 जानेवारी या काळात प्रत्येक दिवशी दीड कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. त्याकरिता पीएमपीचे अध्यक्ष स्वत: लक्ष घालून या उपाययोजना करीत आहेत. त्याचा प्रवाशांना आणि पीएमपीला देखील फायदा होत असल्याचे दिसत आहे.

…या आहेत उपाययोजना
? पहाटे आणि रात्री उशिरा धावणार्‍या गाड्या कमी केल्या
? ‘पिक अवर’मध्ये गर्दीच्या मार्गावर गाड्यांची संख्या वाढवली
? उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांचे कौतुक
? शनिवारी, रविवारी पर्यटन स्थळांवर जादा गाड्या
? सिंहगड, लोणावळा, जेजुरी पर्यटनस्थळी गाड्या वाढविल्या
? ब्रेकडाऊन कमी करण्यावर भर
? मार्गांच्या सुसूत्रीकरणाचे काम सुरू
? रविवारी स्पेशल गाड्या

जानेवारीत असे वाढतेय उत्पन्न
दि. उत्पन्न (आकडे रुपयांत)
9 1,85,65,904
10 1,72,91,796
11 1,67,22,477
12 1,71,09,791
13 1,71,09,791
14 1,53,15,831
16 1,82,70,454
17 1,70,20,435
18 1,69,73,364
19 1,70,44,179
20 1,63,99,804
21 1,56,95,202

पीएमपीचे महिना आणि वार्षिक उत्पन्न मी पदभार घेतला तेव्हा खूपच कमी होते. हे उत्पन्न वाढवून प्रवाशांना चांगली आणि सुरक्षित सेवा पुरविण्यावर आम्ही आता भर देत आहोत. त्यासाठी मार्गांचे सुसूत्रीकरण, ब—ेकडाऊन कमी करणे, ‘पिक अवर’मध्ये गर्दीच्या ठिकाणी गाड्या सोडणे, सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळांसाठी जादा गाड्या सोडणे, यांसारख्या अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

   – ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Back to top button