पुणे : ओला, उबेरच्या टॅक्सी स्टँडचे स्थलांतर; वाहतूक कोंडीतून होणार सुटका

पुणे : ओला, उबेरच्या टॅक्सी स्टँडचे स्थलांतर; वाहतूक कोंडीतून होणार सुटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळ परिसरात असलेले ओला, उबेरचे टॅक्सी स्टँड नव्याने उभारण्यात आलेल्या एरोमॉल या बहुमजली पार्किंगमध्ये नुकतेच स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यासोबतच लवकरच येथील रिक्षा स्टँडसुध्दा स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे नेहमी वाहनांच्या कोंडीने गजबजणारा पुणे विमानतळाचा परिसर आता रिकामा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय हवाई राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या हस्ते या एरोमॉल पार्किंगचे उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर विमानतळ परिसरात असलेले टॅक्सी स्टँड एरोमॉलमध्ये शिफ्ट करण्याची नोटीस विमानतळ प्रशासनाने ओला, उबेरला दिली होती. महिन्याच्या कालावधीनंतर ओला, उबेरने आपले स्टँड दोन दिवसांपूर्वी एरॉमॉलमध्ये शिफ्ट केले आहे. आता रिक्षा स्टँडदेखील हलविण्यात येत आहे. पूर्वी ओला, उबेरच्या वाहनांसाठी लागलेल्या रांगांमुळे आणि रिक्षांच्या रांगामुळे विमानतळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यासोबतच बुक केलेली टॅक्सी प्रवाशांपर्यंत पोहोचायला लागलेल्या रांगांमुळे तासन्स तास जात असे, याचा प्रवाशांना मोठा त्रास होत होता आणि परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीचे चित्र दिसत असे, त्यामुळे विमानतळ प्रशासनाने हा टॅक्सी स्टँड हलविण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news