उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण | पुढारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण

पुणे, पुढारी ऑनलाईन: दिल्लीवरून पुण्यात दाखल झालेले देवेंद्र फडणवीस हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या घरी पोहचले आहेत. फडणवीस यांच्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार? याकडे शहरातील लोकांचं लक्ष लागलं आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

भाजपमध्ये अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याची चर्चा सुरू आहे. तसेच दुसऱ्या अन्य कोणाला दिली तर इच्छुकांची यादी फार मोठी आहे. त्यामुळे इच्छुक सर्व नेत्यांचं मन राखणं भाजपला आता महत्वाचं आहे. जर भाजपला ही पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल तर लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. यासाठी माजी नगरसेवक शंकर जगतापांची समजूत काढणं गरजेचं असणार आहे. उमेदवारीवरून जगताप कुटुंबात कोणतेही वाद होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्वाची भूमिका बजावायला आले, असावेत अशी चर्चा आहे.

 

Back to top button