पारगाव हत्याकांड घटनास्थळी पोलिस महानिरीक्षकांकडून पहाणी | पुढारी

पारगाव हत्याकांड घटनास्थळी पोलिस महानिरीक्षकांकडून पहाणी

नानगाव( ता.दौंड ); पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा.मा. येथील भीमानदीपात्रात दोन कुटुंबातील सात व्यक्तींचा हत्याकांड करुन भीमानदीपात्रात फेकून दिले होते. याच घटनास्थळी २८ जानेवारी दुपारी एकच्या सुमारास पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी भेट देऊन पहाणी केली. येथील भीमानदीपात्रात दि.१८ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत सात व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय मयतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. याच संशयाचा धागा पकडत पोलिसांनी आपले तपास वेगाने फिरवला आणि रातोरात पाच संशयित आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले.

या तपासा दरम्यान घरातील नातलग चुलत भाव बहिणीने बदल्याच्या भावनेतून या सात जणांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. यासंदर्भात यवत पोलिस स्टेशन येथे पत्रकार परिषद घेऊन माहीती देण्यात आली होती. सध्या पुढील तपास सुरु असून यामध्ये दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच संबंधित पाच आरोपींना एक फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असुन यामध्ये अजून आरोपी असल्याचा संशय वर्तविण्यात येत असुन सर्व बाजूने पोलीसांचा तपास सुरु आहे. यावेळी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Back to top button