खोर : आलेगाव रस्त्यावरील पुलाचे काम मार्गी लागणार : आमदार राहुल कुल | पुढारी

खोर : आलेगाव रस्त्यावरील पुलाचे काम मार्गी लागणार : आमदार राहुल कुल

खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील असलेल्या मलठण-काळेवाडी-बोरीबेल-आलेगाव रस्त्यावरील पुलाच्या कामाला हिरवा कंदील मिळाला असून, या रस्त्यावरील दोन पूल मंजूर करण्यात आले असून, या कामासाठी तब्ब्ल 3 कोटी 5 लाखांचा निधी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याची माहिती काळेवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य गणेश गायकवाड यांनी सांगितले.

या बाबत माहिती अशी की, दौंड-सिद्धटेक रस्त्यास जोडणारा आलेगावपासून मलठण-भिगवणपर्यंतच्या रस्त्याचे कामाची दुरुस्ती आमदार राहुल कुल यांच्या पुढाकाराने झाली होती. या मध्यम मार्गावर वाहतूकही वाढली आहे. याचाच विचार करून आमदार राहुल कुल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि दोनही पूल मंजूर करून घेतले.

पावसाळ्यामध्ये पूल असणार्‍या ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी येते. परिणामी, प्रवाशांची खूप मोठी अडचण निर्माण होत होती.
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्या-येण्यासाठी आणि अत्यावश्यक रुग्णांना हॉस्पिटला जाण्यासाठी पावसाळ्यात मोठी अडचण होत होती. हा पूल अरुंद असल्याने पावसाचे पाणी अडून राहून परिसरातील शेतामध्ये हे पाणी जाऊन तेथील पिकाचे व शेतीचे नुकसान होत होते. आजअखेर हे दोन्ही पूल मंजूर झाल्यामुळे काळेवाडी, बोरीबेल व परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

स्थानिक शेतकरी, परिसरातील प्रवाशी, वाहतूकदार यांची अडचण लक्षात घेता आम्ही सातत्याने आमदार राहुल कुल यांच्याकडे या पुलांसाठी पाठपुरावा केला होता. हे पूल मंजूर झाल्यामुळे याचा परिसरामध्ये दळणवळणासाठी फायदा होणार आहे. तब्बल 3.50 कोटी रुपयांचे दोन पूल आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झाल्याने आमच्या मागणीला यश आले आहे.

                  – गणेश गायकवाड, माजी ग्रा.पं. सदस्य, हिंगणीबेर्डी, काळेवाडी

Back to top button