पुणे : अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणात धनंजय देसाईसह एकवीस जण निर्दोष | पुढारी

पुणे : अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणात धनंजय देसाईसह एकवीस जण निर्दोष

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फेसबुकवर महापुरूषांची बदनामी झाल्यामुळे हडपसर भागात उसळलेल्या दंगलीत अभियंता मोहसिन शेख याचा खुन झाल्याच्या प्रकरणात हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय 34, रा. हिंदुगड, मूळशी) यासह 21 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. देसाईच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. सुधीर शहा व अ‍ॅड. अमोल काळे यांनी युक्तिवाद केला.

हडपसर भागात 2 जुन 2014 रोजी दंगल उसळली होती. त्यामध्ये संगणक अभियंता मोहसिन शेख (वय 26, रा. हडपसर, मूळ. सोलापूर) याचा मृत्यू झाला होता. याबाबत मोहसिन याचा भाऊ मोबीन मोहम्मद सादीक शेख (वय 28) याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई (वय 34, रा. हिंदुगड, मुळशी) व 20 जणांना अटक करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

Back to top button