प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात धायरीकरांनी केली आकर्षक तिरंगा फुलांची सजावट | पुढारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात धायरीकरांनी केली आकर्षक तिरंगा फुलांची सजावट

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन व विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्त धायरी येथील भाविकांनी आकर्षक तिरंगा फुलांची सजावट केली. आकर्षक तिरंगा फुलांच्या सजावटीने राष्ट्रीय भावनेचा जागर करण्यात आला. यासाठी तब्बल १ हजार ७४ किलो वजनाचे झेंडु, जरबेरा व आर्केड फुलांचा वापर करण्यात आला.

आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज पहाटे दोन वाजेपर्यंत सजावटीचे काम सुरू होते. त्यासाठी दहा कारागिरांसह धायरी येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण, उद्योजक इंद्रजित दळवी व संदीपशेठ पोकळे यांनी कल्पकतेने सजावट केली.

Back to top button