देहूरोड : श्री हरीचे दररोज नामस्मरण करा : मोरारी बापू

देहूरोड : श्री हरीचे दररोज नामस्मरण करा : मोरारी बापू

देहूरोड : प्रेम आणि भक्ती मनापासून करायला हवे. याचा आनंद आपल्याला सर्व काही मिळवून देतो. जीवनात दररोज श्री हरीचे नामस्मरण करावे, असे मुरारी बापू यांनी सांगितले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे आयोजित आणि जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, देहू निमंत्रित देहूनगरीत आयोजित रामकथेत मोरारी बापू बोलत होते. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, संत तुकाराम संस्थानचे अध्यक्ष नितीनमहाराज मोरे, विश्वस्त संजयमहाराज मोरे, संतोषमहाराज मोरे आदी उपस्थित होते.

मोरारी बापू म्हणाले, हरी शरण हरी शरण बोलत जा. तुमच्या मनातील प्रेमाला तेवढे स्वातंत्र्य आहे. किंबहुना प्रेमाचे दुसरे नाव स्वातंत्र आहे. भगवंताचे कुठलेही नाव घ्या. परंतु, चांगल्या भावनेने आणि एकाच देवाची उपासना करा. यामुळे तुम्हाला मुक्तीचा मार्ग सापडेल.
गुरूला शरण जा गुरूला शरण जा, गुरुचे नामस्मरण करा आणि गुरुंच्या पादुकांना शरण जा, असे मुरारी बापू म्हणाले.

ते म्हणाले, की मनुष्याच्या चेहर्‍यावर पाच पद्धतीने तेज येते. त्याग, तप, वैराग्य, तृप्ती आणि चिकित्सा या त्या पाच गोष्टी आहेत. सर्व गोष्टींचा त्याग करा. तो बसलेला सर्वकाही देणारा आहे. माणसाने तप करा, तापून चेहर्‍यावर तेज येते. अंगातली शक्ती क्षीण होते. पाणी व वाणी यांचा संबंध जोडून पहा. भरपूर पाणी असलेल्या तळ्यात मासे किती आनंदाने राहतात. तसेच आपले तोंड जर चांगले असेल तर कोणीही जवळ बसेल, असे मुरारी बापू म्हणाले.

नेहमी माणसाला हलके फुलके ठेवावे
संतांनी कायम करारी चेहरा ठेवून बसू नये. त्यांनी विनोद पण केले पाहिजेत. चेहर्‍यावर स्मित हास्य पण पाहिजे. हलक्या फुलक्या कथा सांगितल्या पाहिजेत. तेव्हा त्याचे संतपण योग्य होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news