पिंपरी : केंद्रीयमंत्री आठवले यांच्याकडून जगताप कुटुंबीयांचे सांत्वन | पुढारी

पिंपरी : केंद्रीयमंत्री आठवले यांच्याकडून जगताप कुटुंबीयांचे सांत्वन

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी भेट देऊन जगताप कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, दिवंगत आमदार जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, लहान बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची विचारपूस करत सांत्वन केले.

तसेच, आमदार जगताप यांच्यासोबत राजकारणाच्या माध्यमातून आलेला संपर्काची आठवण करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे, कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, सुरेश निकाळजे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button