निगडी डेपोचे वर्षभराचे उत्पन्न 56 कोटी

निगडी डेपोचे वर्षभराचे उत्पन्न 56 कोटी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडमधील 27 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पीएमपीच्या माध्यमातून वाहतूक सेवा दिली जाते. शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातदेखील पीएमपीची सेवा दिली जाते. यामधून पीएमपीएमएलच्या खात्यात भरघोस उत्पन्नाची भर पडत आहे. शहरातील तीन आगारांमधून विविध मार्गांवर धावणार्‍या बसच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळत आहे. यामधील निगडी आगारातून 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत तब्बल 55 कोटी 80 लाख 62 हजार 948 रुपयांचे भरघोस उत्पन्न पीएमपीला प्राप्त झाले आहे.

निगडी-लोणावळा, निगडी- वडगाव, नवलाख उंबरे या मावळातील मार्गावर बस धावतात. तसेच शहराअंतर्गत आणि पुणे शहरसाठी मोठ्या प्रमाणात बस धावतात. यातून आगाराला मोठे उत्पन्न मिळते. अनेकदा पीएमपीने दिवसाचे ठरवून दिलेल्या उत्पन्नापेक्षाही जास्त उत्पन्न निगडी आगारातून मिळाले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत निगडी आगार प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.

43 क्रमांकाची बायपास मार्गे जाणार्‍या बसला प्रतिसाद
निगडी आगारामधून 43 क्रमांकाची बायपास मार्गे कात्रजला जाणारी बस प्रशासनाने दुसर्‍या आगारामधून सुरू केली. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद न भेटल्याने व निगडी मार्गातील प्रवाशांच्या मागणीवरून ही बस पुन्हा आगारामधून सुरू करण्यात आली. त्यामुळे निगडी आगारातून लोणावळा तसेच कात्रज या मार्गावर धावणार्‍या बसलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निगडी आगारातील उत्पन्न
(जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022)
महिना उत्पन्न (रुपयांमध्ये)
जानेेवारी ः तीन कोटी 97 लाख 13006
फेब्रुवारी ः चार कोटी 25 लाख 35 हजार 615
मार्च ः चार कोटी 86 लाख 19 हजार 278
एप्रिल ः चार कोटी 69 लाख 93 हजार 338
मे ः पाच कोटी 1 लाख 12 हजार 317
जून ः चार कोटी 85 लाख 63 हजार 602
जुलै ः चार कोटी 44 लाख 38 हजार 423
ऑगस्ट ः चार कोटी 71 लाख 96 हजार 882
सप्टेंबर ः चार कोटी 78 लाख 86 हजार 471
ऑक्टोबर ः चार कोटी 43 लाख सात हजार 599
नोव्हेंबर ः चार कोटी 82 लाख 96 हजार 411
डिसेंबर ः चार कोटी 94 लाख सहा रुपये

भक्ती-शक्ती आगारामधून प्रवाशांच्या सोयीनुसार आणि पीएमपीच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनावरून योग्य नियोजन केले जात आहे. त्यानुसार, बसच्या वेळेत बदल आणि अंतर कमी करून किलोमीटरमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निर्णयाचे योग्य परिणाम दिसून आले आहेत.

                                                                     – शांताराम वाघेरे,
                                                             व्यवस्थापक, निगडी आगार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news