पुणे: फोटो, व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेल, अनेक महिन्यांपासून तरुणीवर अत्याचार | पुढारी

पुणे: फोटो, व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेल, अनेक महिन्यांपासून तरुणीवर अत्याचार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: तरुणीला प्रेमात पाडून तिच्याशी गोड बालून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बाणेर येथील एका 22 वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या दिल्लीतील मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे 2022 पासून सुरू होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकाजवळ राहात होते. आरोपींनी फिर्यादीशी जवळीक साधून मैत्री केली. तिचा विश्वास संपादन करून मैत्रीचे प्रेमात रुपांतर केले. तिला कामानिमित्त रुमवर बोलावले. तू मला खूप आवडतेस, तू खूप सुंदर आहेस, तू माझी नाही तर कोणाची होणार नाही, असे बोलून तिच्याबरोबर शारीरिक संबंध जोडले. त्या वेळी फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच तिचे हे व्हिडिओ व फोटो फिर्यादी व तिच्या बहिणीला पाठवून बदनामी केल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली असून, पोलिस निरीक्षक चिंतामण तपास करीत आहेत.

Back to top button