देऊळगावगाडा येथे जलजीवन योजनेच्या कामाला सुरुवात | पुढारी

देऊळगावगाडा येथे जलजीवन योजनेच्या कामाला सुरुवात

खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : देऊळगावगाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील सुमारे 33 महसुली गावांतील पाणीपुरवठा योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व 69 महसुली गावांच्या पाणीपुरवठा योजना या जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित केलेल्या आहेत. काही गावांतील पाणीपुरवठा योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. त्यांना तातडीने मान्यता मिळावी, तसेच उर्वरित गावांच्या पाणीपुरवठा योजनांना लवकरात लवकर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळण्याची मागणी होत होती.

त्यानुसार देऊळगावगाडा येथील जलजीवन मिशन पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून पाणी योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. पाणी योजनेला 10 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक घरात नळजोड देऊन योजना करून
घेणे ही संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.

याप्रसंगी सरपंच कल्पना शितोळे, उपसरपंच प्रमिला वाघापुरे, वैशाली बारवकर, अक्षय बारवकर, विशाल बारवकर, गणेश जाधव, राजवर्धन जगताप, विजया बारवकर, ग्रामसेविका प्रज्ञा चव्हाण, भाऊसाहेब शितोळे, नंदकुमार बारवकर, माऊली वाघापुरे, किरण बारवकर, तुषार शितोळे, धैर्यशील शितोळे आदी उपस्थित होते.

Back to top button