

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जबरी चोरी करणार्या दोन दुचाकीस्वार चोरट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी पकडले. नर्हे येथील झील कॉलेजच्या गेटजवळून निघालेल्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने त्यांनी हिसकावले होते. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय 20), राजू महादेव इंगळे (वय 19) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत नर्हे येथील एका 46 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.