वंचित-शिवसेना युती नंतर अजित पवार यांचे सूचक विधान | पुढारी

वंचित-शिवसेना युती नंतर अजित पवार यांचे सूचक विधान

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेने वंचित आघाडी सोबत युती केली आहे. मात्र, त्यांच्या सोबत संबंध जुळले तर पुढचा निर्णय घेऊ असं सुचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी पुण्यात केले.

वंचित आघाडी आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र, जागवाटपावरून वाद पेटण्याची चिन्हं आहेत. अजित पवार यांनी शिवसेनेनं आपल्या कोट्यातून जागा द्यावी अशी भूमिका घेतली होती. तर उद्धव ठाकरेंनी वंचित महाविकास आघाडीचाच घटक असणार आहे, असं स्पष्ट केलं. त्यावर पवार म्हणाले की, आज आमच्या बैठकीमध्ये पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही विषयावर चर्चा करणार आहे. आजच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ताकद उद्धव ठाकरे यांची आहे. वंचितसोबत संबंध जुळले तर पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीने आपआपले मित्र पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे, असहीं पवार म्हणाले.

Back to top button