पुणे: आता एमआयएमही लढवणार कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक | पुढारी

पुणे: आता एमआयएमही लढवणार कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष चिंचवड विधानसभा व कसबा विधानसभा पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख, युवक शहराध्यक्ष शाहिद शेख आणि पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा रुहीनाज शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या दोन विधानसभा मतदारसंघात 27 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे, तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात एमआयएम उमेदवार देणार असून, खासदार आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाझ जलील यांच्या नेतृत्वात व प्रदेश महासचिव तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता पक्षातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्‍यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून बूथ बांधणी, मतदार पन्नाप्रमुख, सक्षम प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून पोटनिवडणूक जिंकण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. उमेदवारांची चाचपणी करून पक्ष निर्णय समिती व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

Back to top button