पारगावला भीमा नदीपात्रात 5 दिवसांत आढळले 4 मृतदेह; मृतांमध्ये दाम्प्त्याचा समावेश

पारगावला भीमा नदीपात्रात 5 दिवसांत आढळले 4 मृतदेह; मृतांमध्ये दाम्प्त्याचा समावेश
Published on
Updated on

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीपात्रात पाच दिवसांत चार मृतदेह सापडले आहेत. त्यातील तीन महिलांचे आहेत. 18, 21 आणि 22 जानेवारीला महिलांचे मृतदेह मिळाले, तर 20 जानेवारीला पुरुषाचा मृतदेह सापडला.
या सर्व प्रकरणी यवत पोलिस तपास करीत आहेत. चारमधील दोन मृतदेहांची ओळख पटली असून दोन पुरुष मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. मारूती पवार (रा. गेवराई, जि. बीड) यांचा एक मृतदेह असून यांच्या पत्नीचाही मृतामध्ये समावेश आहे.

मात्र त्यांचे नाव कळू शकले नव्हते. ते दोघेही उसतोड कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या सर्वांचा पाण्यात पडून मृत्यू झाला असेल, अशी शंका पोलिस खात्याकडून व्यक्त केली जात आहे. एका महिला मृतदेहाच्या ब्लाऊजमध्ये मोबाईल मिळाला आहे. नदीपात्र असलेल्या पुलाच्या पश्चिम भागात अगदी जवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, त्याचे ढापे बंद असल्याने पाणी अडविले गेले आहे. काही प्रमाणात गळतीचे पाणी वाहत असल्याने हे मृतदेह फार लांबून आल्याची शक्यता दिसत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news