पिंपरी : आचारसंहितेमुळे ‘जनसंवाद’ नाही

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने महिन्यातील पहिल्या व चौथ्या सोमवारी होणारी जनसंवाद सभा चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे होणार नाही. आचारसंहिता संपेपर्यंत सभा घेतली जाणार नाही, असे प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी शुक्रवारी (दि. 20) सांगितले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता बुधवार (दि. 18) पासून सुरू झाली आहे. त्यामुळे जनसंवाद सभा होणार नाही, असे वृत्त ‘पुढारी’ने दिले होते. त्यासंदर्भात पालिका प्रशासनाने आदेश जारी केला आहे. त्यामुळे जनसंवाद सभा घेण्यासाठी नेमलेले समन्वय अधिकारी तसेच कामकाजातील अधिकारी व कर्मचार्यांनी हायसे व्यक्त केले आहे. निवडणुक आचारसंहिता 2 मार्च 2023 पर्यंत आहे. तोपर्यंत जनसंवाद सभा होणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.