जेजुरीच्या गणेश पतसंस्थेत 2 कोटींचा अपहार; अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 13 लाख 66 हजार 17 रुपयांचा गैरव्यवहार व आर्थिक अपहार केल्याची फिर्याद पुणे विभागातील लेखापरीक्षक श्रेणी-2 ईरण्णा चंद्रकांत सावळगी यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादीनुसार संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी आदींनी संगनमताने सभासद खातेदार, ठेवीदारांचा विश्वासघात करीत मोठा आर्थिक गैरव्यवहार व अपहार केला असून, त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

विभागीय सहनिबंधकांच्या फिर्यादीनुसार या पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र बाबूराव जगताप, सचिव छाया यशवंत पवार, खासगी लेखापरीक्षक यशवंत बबन पवार, व्यवस्थापक अश्विनी सुरेश धुमाळ तसेच कर्जदार शरद दत्तात्रय शेळके, ज्ञानेश्वर जयवंत मांढरे, विजय वसंत दरेकर, विश्वनाथ कृष्णा पवार, गणेश चंद्रकांत पवार, नवनाथ एकनाथ पवार, संदीप शंकर दुर्गाडे, दत्तात्रय अण्णासाहेब राणे, सुरेश कृष्णाजी धुमाळ, संदीप एकनाथ पवार, सचिन रामचंद्र दुर्गाड़े, महादेव श्रीपती शेडगे, तसेच खासगी लेखापरीक्षक अमीर रशीदभाई बागवान, सुरेश रामचंद्र शिंगटे आणि शिवाजी ज्ञानेश्वर घारे या 19 जणांवर आर्थिक फसवणूक व अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

वरील सर्व आरोपींनी संस्थेच्या हितात बाधा आणत संस्थेच्या सभासदांची, खातेदार, कर्जदार, ठेवीदार यांची मोठी फसवणूक केली आहे. संस्थेचे अध्यक्ष व संचालकांनी गैरहेतूने, कटकारस्थान करून खोटे, बनावट ठराव करणे, खोटी कर्ज प्रकरणे दाखविणे, खोटे व बनावट लेखापरीक्षण करून शासनाची फसवणूक करणे, राष्ट्रीयीकृत बँकेची फसवणूक करणे, रोजकीर्दमध्ये खोट्या व बनावट नोंदी करणे, ठेवीदारांच्या खोट्या नोंदी करून फसवणूक करणे आदी गुन्ह्यांतर्गत लेखापरीक्षकांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news