पुणे : आनंद घेणे, हाच सदा सुखी राहण्याचा मंत्र : क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव | पुढारी

पुणे : आनंद घेणे, हाच सदा सुखी राहण्याचा मंत्र : क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आयुष्यात जे घडत आहे तो प्रत्येक क्षण मनापासून अनुभवा. वर्तमानात जगा, स्वतःवर प्रेम करा आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, हाच जीवनात आनंदी राहण्याचा, सदा सुखी राहण्याच्या मंत्र असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. बांधकाम क्षेत्रात गेली 40 वर्षे कार्यरत असलेल्या कोहिनूर ग्रुपतर्फे नुकतेच सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जे डब्लूमेरीएट या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात कपिलदेव बोलत होते. या वेळी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, सह-व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल, राजेश गोयल, संचालक रघू अय्यर उपस्थित होते.

प्रसिद्ध क्रीडा निवेदिका रीधिमा पाठक यांनी कपिलदेव यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमात कपिलदेव व कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते कोहिनूर ग्रुपच्या वाकड येथील 39, कोहिनूर वेस्ट व्ह्यू रिझर्व – न्यू वाकड या नवीन रहिवासी प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले.
कपिलदेव म्हणाले, ’आपल्या आसपास पाहिले, तर अनेक जण एखादा क्षण अनुभवण्याऐवजी मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त असतात. तर काही जण मला एखादी गोष्ट जमेल की नाही, मी किती कमनशिबी आहे, हा विचार करून त्रस्त व दुःखी होतात. मात्र तसे न करता, आहे तो प्रत्येक क्षण मनापासून जगा, स्वत:साठी जगा आणि यश मिळवण्यासाठी मनापासून मेहनत करा.’

‘कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1983 साली विश्वचषक जिंकला. योगायोग म्हणजे त्याच साली कोहिनूर ग्रुपची देखील सुरुवात झाली. या दोन्ही प्रसंगांना आता 40 वर्षे पूर्ण होत आहेत. कोहिनूरचा हा प्रवास अविस्मरणीय होता. या दरम्यान, एक महत्त्वाची गोष्ट आम्ही शिकलो, ती म्हणजे व्यवसायात प्रामाणिकपणा राखणे आणि नवीन बदलांचा स्वीकार करत, ते आत्मसात करणे. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा बदल होता तो तंत्रज्ञानाचा. यापुढेही ग्रुपची वाटचाल एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पुढील काळात पुण्याच्या चहूबाजूंना कोहिनूर ग्रुप आपले प्रकल्प उभारणार आहे.

                                                    – कृष्णकुमार गोयल,
                              अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोहिनूर ग्रुप

Back to top button