वडगाव शेरीत टीपी स्किम! शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव | पुढारी

वडगाव शेरीत टीपी स्किम! शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव

पुणे : वडगाव शेरी येथे नगररचना परियोजना (टी.पी. स्कीम) राबविली जाणार असून याचा प्रारूप नगररचना योजनेचा मसुदा लवकरच प्रसिध्द केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडुन शहर सुधारणा समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
वडगावशेरी या गावाचा समावेश 1997 मध्ये महापालिका हद्दीत झाला. या गावाचा प्रारूप विकास आराखडा 2005 मध्ये प्रसिध्द करण्यात आला. त्यानंतर 2007 मध्ये टप्पाटप्पाने विकास आराखडा (डिपी) मंजुर करण्यात आला.

मात्र अद्याप 2007 पासुन वडगावशेरीमधील डीपी रस्त्याच्या काही जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या नाही. काही जागा मालक रस्ते विकसित करण्यासाठी विरोध करत आहे. परिणामी, वडगाव शेरीचा पुरेसा विकास झालेला नाही. या पार्श्वभूमीवर वडगावशेरी गावामधील सं.न. 17/1/3ब, 10/4, 11/1 /2/3 या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टी.पी स्कीम राबविण्याची मागणी माजी नगरसेविका शितल शिंदे यांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. शहर सुधारणा समितीच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

Back to top button