जिल्हास्तरावर खेड तालुका प्रथमस्थानी; पुणे येथे पार पडला यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव | पुढारी

जिल्हास्तरावर खेड तालुका प्रथमस्थानी; पुणे येथे पार पडला यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवात बालेवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत खेड तालुक्याने 47 गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करून चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, लेजीम, लोकनृत्य, भजन, धावणे, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते खेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे यांना चॅम्पियन ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

खेड तालुक्यातील शाळांची कामगिरी पुढीलप्रमाणे : लेजीम प्रथम – छोटा गट मुले – जि. प. शाळा धानोरे, भजन स्पर्धा लहान गट – प्रथम – जि.प. प्राथ. शाळा, धानोरे, मोठा गट – प्रथम – जि.प. प्राथ. शाळा, धानोरे, लेजीम – लहान गट मुली – प्रथम – जि.प.प्राथ. शाळा, नाणेकरवाडी, खो खो मोठा गट मुले – प्रथम – जि.प प्राथ. शाळा, भोसे, 50 मी. धावणे मुले – उमेश सप्रे – प्रथम – जि.प. प्राथ. शाळा, थोपटवाडी, 50 मी. धावणे मुली – प्रथम – अनुष्का शिंदे – जि.प. प्राथ. शाळा, रानमळा, उंच उडी मुली – प्रथम – तनिष्का लहू राक्षे – जि.प. प्राथ. शाळा, टाकळकरवाडी, उंच उडी लहान गट – प्रथम – शुभम प्रजापती, जि.प. प्राथ. शाळा. आंबेठाण, लांब उडी लहान गट – शुभम प्रजापती – प्रथम, लांब उडी मोठा गट मुले – प्रथम -रिझवान अन्सारी -जि.प. प्राथ. शाळा सोळू, लेजीम – मोठा गट मुले- व्दितीय – जि.प. प्राथ. शाळा, खराबवाडी, मोठा गट – मुली- व्दितीय – जि.प. प्राथ. शाळा, खराबवाडी, खो -खो लहान गट – व्दितीय – जि.प. प्राथ. शाळा,टेमगिरवाडी, खो खो मुली लहान गट -द्वितीय – जि.प. प्राथ. शाळा भोसे, लोकनृत्य मोठा गट – तृतीय – जि.प. प्राथ. शाळा भोसे, 100 मी. धावणे – द्वितीय – मोहिनी संदेश राठोड – जि.प. प्राथ. शाळा, होलेवाडी, वक्तृत्व स्पर्धा मोठा गट – द्वितीय – अनुष्का अभिजित नाईकरे – जि.प. प्राथ. शाळा, टाकळकरवाडी, लहान गट- द्वितीय – शेवंती महादेव कांबळे, जि.प. प्राथ. शाळा, कुरुळी, वक्तृत्व स्पर्धा लहान गट – अपूर्व अभिजित नाईकरे – तृतीय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी विजयी स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Back to top button