महाळुंगे पडवळ : बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू | पुढारी

महाळुंगे पडवळ : बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू

महाळुंगे पडवळ(ता. आंबेगाव): वडगाव काशिंबेग येथील मानकर मळ्यात बुधवारी (दि. 18) रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकरी संतोष बापू मानकर यांचे नुकसान झाले. घटनेची माहिती नवनाथ मानकर यांनी मंचर येथील वनविभागाच्या कार्यालयात दिली.

मंचर वनक्षेत्रपाल प्रदीप रौंधळ, वनपाल संभाजी गायकवाड, वनरक्षक सागर भोर, ग्रामपंचायत सदस्य अनिल मानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. शिंदे यांनी शवविच्छेदन केले. भक्ष्य शोधण्यासाठी बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करू लागल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी उपसरपंच योगेश पिंगळे यांनी केली आहे.

Back to top button