सावधान, तुमच्यासोबतही असं घडू शकतं ! गॅस रेग्युलेटर पडला पावणे सहा लाखांना | पुढारी

सावधान, तुमच्यासोबतही असं घडू शकतं ! गॅस रेग्युलेटर पडला पावणे सहा लाखांना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्यात राहणार्‍या एका ज्येष्ठ नागरिक महिलेस गॅस रेग्युलेटर बदलण्याच्या नादात ऑनलाइन व्यवहारात पावणेसहा लाख रुपये गमवावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात नीलिमा अविनाश भिडे (वय 64, रा. पुणे) यांनी अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 4 जानेवारी रोजी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिडे या त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बसत नसल्याने, त्यांनी गुगलवर एचपी कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधला. त्यानुसार त्यांनी ऑनलाइन मिळालेल्या नंबरच्या आधारे आरोपीशी संर्पक साधला आणि रेग्युलेटर बाबत माहिती सांगितली. त्यावर आरोपीने त्यांना सुरुवातीला त्यांच्या मोबाईलवर क्वीक हेल्प अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून 25 रुपये आरोपीने त्याच्या खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिला यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या खात्यातून एकूण पाच लाख 74 हजार रुपये परस्पर काढून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्याबाबत तक्रारदार यांनी उशिराने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, याबाबत पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

Back to top button