पुणे : अतिक्रमणांवर हातोडा ; आरटीओ कडून अनधिकृत कॅन्टीन केले जमीनदोस्त | पुढारी

पुणे : अतिक्रमणांवर हातोडा ; आरटीओ कडून अनधिकृत कॅन्टीन केले जमीनदोस्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या अनेक वर्षांपासून आरटीओ कार्यालयात अनधिकृतरित्या उभे असलेले एक कॅन्टीन गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जमीन दोस्त करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आरटीओ विभागाअंतर्गत गुरुवारी दुपारी कारवाई करण्यात आली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान याबाबत आरटीओ अधिकारी डॉ. अजित शिंदे म्हणाले, आरटीओला या जागेचा महसूल खात्यामार्फत ताबा देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपूर्वी या जागेची भाडे करार वैधता संपली होती, त्यामुळे येथील असुरक्षित बांधकाम संपुष्टात आणण्यात आले. आणि जागा ताब्यात घेण्यात आली आहे. आरटीओतील जनतेच्या कामांसाठी या जागेची गरज होती. त्यानुसार ती जागा वापरली जाईल.

Back to top button