डाळज येथील अपघातात सहा जण जखमी; पुणे- सोलापूर महामार्गावर दुर्घटना | पुढारी

डाळज येथील अपघातात सहा जण जखमी; पुणे- सोलापूर महामार्गावर दुर्घटना

पळसदेव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावरून निघालेली स्कार्पिओ गाडीवरील वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ती महामार्गावरून सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाली. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात डाळज नं. 3 (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. 18) पहाटे 5 च्या सुमारास घडला. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सोलापूरकडे चाललेली स्कार्पिओ गाडी (एमएच 16 बीझेड 6558) वरील चालक मनोज कौठळे (वय 21, रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याचे त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पुणे-सोलापूर सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाले.

यामध्ये विलास वंजारी (वय 50, रा. निंबवी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), बाळासाहेब गुंजाळ (वय 49, रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नाथा गुंजाळ (वय 62), बाळासाहेब गायकवाड (वय 54), बाळू पवार (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि आर्या कवठळे (वय 14) हे किरकोळ जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी भिगवण व येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यावेळी महामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सांगळे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी अपघातग्रस्त वाहन तातडीने रस्त्याच्या बाजूस घेऊन वाहतूक सुरळीत करून दिली.

Back to top button