मोठी बातमी! कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर | पुढारी

मोठी बातमी! कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. 31 जानेवारीपासून 7 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. पोटनिवडणुकीसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे भाजपचे प्रत्यत्न असले तरी विरोधकांनी मात्र अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुख्यत्वे कसबापेठ मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमुळे या दोन्ही मतदार संघात शिवसेना(उद्धव ठाकरे) यांची भूमिका महत्वाची ठरेल.

Back to top button